पाइपलाइनद्वारे गॅसला सोसायट्यांची पसंती: पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गॅस सिलिंडरची संख्या मर्यादित केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणी भासू लागल्या आहेत. मान्य सिलिंडरपेक्षा अधिक सिलिंडर घेताना जादा पैसे मोजावे लागत असल्याने सीएनजी गॅसला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडे नोंदणी करून पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा व्हावा, यासाठी सोसायटीधारकांची संख्या वाढू लागली आहे.
शहरात पाइपलाइनने गॅसपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडे (एमएनजीएल) देण्यात आले आहे. या कंपनीकडून शहरात त्यासाठीच्या पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठ्याचे काम या कंपनीने सुरू केले आहे. मार्चअखेर 10 हजार घरांना गॅसचा पुरवठा कंपनीकडून करण्यात येणार आहे, तर या वर्षअखेर 25 हजार कुटुंबांना गॅसपुरवठा करण्याचे उदिष्ट कंपनीने ठेवले असल्याची माहिती तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
No comments:
Post a Comment