Saturday, 2 February 2013

अनधिकृत बांधकामाचा निर्णय टांगणीला

अनधिकृत बांधकामाचा निर्णय टांगणीला पिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करायची असल्यास हा नियम राज्यातील सर्व अनधिकृत बांधकामांना लावावा लागेल, असे विधी व न्याय विभागाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले असल्यामुळे लाखो अनधिकृत बांधकामाबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामावरून गेल्या चार वर्षांपासून दररोज सत्ताधारी व विरोधक "राणा भीम देवी थाटात' गर्जना करीत आहेत. परंतु, अद्याप लाखो अनधिकृत बांधकामधारकांच्या हाती निराशाच आलेली आहे. भविष्यात सरकारने या संदर्भात नवीन कायदा केला नाही तर या प्रश्‍नावर केवळ सर्वच पक्ष राजकारण करीत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

No comments:

Post a Comment