विकलेले ३ फ्लॅट पुन्हा विकून गंडा: पिंपरी । दि. ३१ (प्रतिनिधी)
विकलेल्या सदनिकेची पुन्हा विक्री करून ग्राहकांला सव्वा कोटीला गंडा घालणार्या बांधकाम व्यावसायिकासह मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यावर पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यात बांधकाम व्यावसायिक शैलेंद्र आनंदस्वरूप गोयल व एजंट दीपक कविटकर यांचा समावेश आहे.
याप्रकरणी पुनीतकुमार शंकरलाल गोल्हाण (वय ३३, रा. रामविलास, सोसायटी, कोरगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. वाकड येथे गोयल यांचा एरिस्टो या नावाने गृहप्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पासाठी सदनिका विक्रीचे काम कविटकर करतो. त्यामुळे पुनीतकुमार यांची कविटकरशी भेट झाली. ‘मी तुम्हाला वाकडला सदनिका घेऊन देतो, असे त्याने सांगितले आणि पुनीतकुमार यांना सदनिकेच्या अधिक माहिती घेण्यासाठी आकुर्डीतील तपस्वी कॉम्लेक्समध्ये बोलावले. तेथे गेल्यावर पुनीतकुमार यांना सदरच्या प्रकल्पात कोणत्या सदनिका शिल्लक आहेत, याची माहिती दिली. त्यानंतर ४0१, ४0२, ४0३ या तीन सदनिका घेण्याची तयारी पुनीतकुमार यांनी त्या वेळी दर्शविली. व्यवहार ठरला. त्यानुसार सदनिका खरेदीपोटी एक कोटी २२ अशी रक्कम खरेदी कागदपत्रांसाठी आठ लाख द्यावेत असे ठरले. तसेच कमिशन म्हणून एक लाखाची रक्कम घेतली. त्यानंतर पुनीतकुमार यांनी या सदनिकांबाबत चौकशी केली तेव्हा त्या पूर्वीच विकलेल्या आहेत, अशी माहिती मिळाली. गोयल व कविटकर यांनी संगनमताने फसविल्याचे लक्षात आले.
पुनीतकुमार यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment