दिवसाला ११00 अपॉइंटमेंट: पुणे। दि. ९ (प्रतिनिधी)
दिवसाला ११00 पासपोर्ट अपॉइंटमेंट उपलब्ध करून देण्यात येत असून पासपोर्ट वितरित करण्याच्या कामामध्ये ६४ टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती मुख्य पासपोर्ट अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी दिली आहे. नागरिकांना पासपोर्ट मिळण्यात अनेक अडचणी येत असल्याने त्याविरोधात पासपोर्ट तक्रार निवारण समितीच्यावतीने मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. मुंबई येथे वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत अपॉइंटमेंट उपलब्ध करून देणे, चौकशी केंद्र सुरू करणे, पासपोर्ट सेवा केंद्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करणे आदी आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आल्याचे परदेशी यांनी स्पष्ट केले आहे.
पासपोर्टकरिता पूर्वी दिवसाला ६00 अपॉइंटमेंट मिळत होत्या त्यामध्ये वाढ करून त्या ११00 पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. पासपोर्ट वितरित करण्याच्या प्रमाणामध्ये ६४ टक्के इतकी वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे, अशी माहिती परदेशी यांनी दिली.
No comments:
Post a Comment