६,३00 मीटर उंचीवर वाजवले राष्ट्रगीत: पिंपरी। दि. ९ (प्रतिनिधी)
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याच्या राष्ट्रगीतवादनाची ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. नुकतेच त्याला याबाबतचे प्रमाणपत्र मिळाले.
भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या सदस्यांनी मागील वर्षी एव्हरेस्टवर स्वारी केली होती. त्यादरम्यान बनसोडे याने ६ मे रोजी एव्हरेस्ट कॅम्प-२ च्या ६ हजार ३00 मीटर उंचीवर ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत गिटारवर वाजवून जागतिक विक्रम केला. ऑगस्ट २0१२ला याची नोंद लिम्का बुकमध्ये झाली होती. ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये हा विक्रम ‘सर्वांत उंचावर भारताचे राष्ट्रगीत वाजविणारा’ अशा मथळ्याखाली नोंदले गेले आहे. ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडेदेखील बनसोडेची ही कामगिरी पाठवण्यात आली आहे.
‘‘देशाच्या अभिमानासाठी काही तरी करू शकलो, याचे समाधान वाटते,’’ असे बनसोडेने सांगितले. यापूर्वी बनसोडेने १५ ऑगस्ट २0११ ला अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील माउंट शास्ता शिखरावर राष्ट्रगीत वाजवून विक्रम केला होता.
No comments:
Post a Comment