Friday, 24 May 2013

आयुक्‍तांच्या कारभाराबाबत "थोडी खुशी थोडा गम'

आयुक्‍तांच्या कारभाराबाबत "थोडी खुशी थोडा गम'

पिंपरी- आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 23 मे 2012 रोजी महापालिकेची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर दोन महिने ते प्रशिक्षणाकरिता अमेरिकेला गेल्याने काम करण्यासाठी त्यांना दहा महिन्याचा कालावधी मिळाला. अनधिकृत बांधकामावरील कारवाई, अधिकाऱ्यांवर उगारलेला कारवाईचा बडगा व वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची केलेल्या बदल्या यामुळे राजकीय व्यक्‍तींकडून विरोध झाला. मात्र, प्रशासकीय कामकाजाला लावलेली शिस्त, भ्रष्टाचार रोखण्यासाठी उचललेली पावले यामुळे आयुक्‍त नागरिकांच्या गळ्यातील ताईत होऊ लागले आहेत. त्यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीच्या धडाकेबाज वर्षपूर्तीनिमित्त पदाधिकाऱ्यांनी "थोडी खुशी, थोडा गम' अशा प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment