Thursday, 30 May 2013

संसदेत राजगुरुंचे तैलचित्र लावा

संसदेत राजगुरुंचे तैलचित्र लावा: पिंपरी : संसद भवनात शहीद भगतसिंग यांच्या बरोबरीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे तैलचित्र लावण्याची मागणी शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा सचिवालयाकडे केलेली आहे.

संसद भवनाच्या कमिटी रुम नं. ६३ मध्ये शहीद भगतसिंग व बी. के. दत्त यांची तैलचित्रे लावण्यात आली आहे. परंतु, स्वातंत्र्यासाठी शहीद भगतसिंगच्या बरोबरीने आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्मा राजगुरू शिवराम हरी व सुखदेव थापर यांची तैलचित्रे अद्याप लावण्यात आलेली नाहीत. ही बाब लक्षात घेऊन खासदार आढळराव पाटील यांनी अवर सचिव अरुण कुमार यांना पत्र पाठवून हुतात्मा राजगुरू व सुखदेव यांची तैलचित्र लावण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आणले होते.

No comments:

Post a Comment