Thursday, 30 May 2013

‘ऋणातून मुक्ततेसाठी देवाचे स्मरण करावे’

‘ऋणातून मुक्ततेसाठी देवाचे स्मरण करावे’: पिंपरी : माता-पित्याचे ऋण आयुष्यभर स्मरणात ठेवायचे असतात, ऋणातून मुक्त होण्यासाठी देवाचे स्मरण करावे, असे विचार ह.भ.प. चांगुनेमहाराज यांनी कीर्तनातून मांडले.

दत्तनगर, चिंचवड येथील दत्तमंदिर प्रांगणात चांगुनेमहाराज यांची कीर्तनसेवा मंगळवारी झाली. त्यांनी ‘गोविंद गोविंद मना लागलीया छंद। मग गोविंद ते काया। भेद नाही देवा तया। आनंदले मन। प्रेमे पाझरती लोचन। तुका म्हणे आळी। जिवे नुरेचि वेगळी।।’ या संत तुकोबांच्या अभंगावरील निरुपण केले. ते म्हणाले,‘‘गोविंद म्हणजे ज्ञानेंद्रिये अन् कर्मेंद्रिये एकत्रित करून गोविंदाचे म्हणजे भगवंताचे नामस्मरण करणे. कासव हे आपले सर्व इंद्रिये एकत्र करते म्हणून आपल्या सर्व मंदिरांच्या बाहेर कासवाचे शिल्प असते. त्याचप्रमाणे आपली इंद्रिये एकवटून भगवंताच्या ठायी मन वळवले, तर आपला देह गोविंदस्वरूप होतो आणि देवात व आपल्यात भेद राहात नाही.

No comments:

Post a Comment