बोरकर यांना ‘कोकणगौरव’: पिंपरी : हुतात्मा बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कोकण गौरव, उद्योगरत्न पुरस्कार चिंचवडगाव येथील सरला बोरकर यांना प्रदान करण्यात आला.
गोखले सभागृह (पनवेल) येथे नगराध्यक्षा चारुशिला घरत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एस. एस. सुराडकर, डॉ. रोहिदास वाघमारे, संस्थेचे अध्यक्ष सुनील फडतरे व अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
No comments:
Post a Comment