Saturday, 1 June 2013

तलाठी नसल्याने कामे रखडली

तलाठी नसल्याने कामे रखडली: - रहाटणी परिसरातील नागरिक त्रस्त

रहाटणी : येथील तलाठी कार्यालयात अनेक दिवस तलाठीच हजर नसल्याने नागरिकांच्या विविध कामांना विलंब लागत आहे. तलाठय़ाची रोज प्रतीक्षा करून नागरिक हैराण झाले आहेत. १५ एप्रिलला बदलून आलेले तलाठी नक्की कोण, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

१५ एप्रिल २0१३ रोजी रहाटणी येथील तलाठी कार्यालयात सचिन मोरे यांनी पदभार स्वीकारला. मात्र त्यांच्याकडे देहू येथील अतिरिक्त कार्यभार असल्याने ते रहाटणी कार्यालयास वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. उत्पन्नाचे दाखले, सात-बारा, बोजा चढवणे-उतरवणे, सातबारावर नाव चढवणे, उतरवणे यांच्यासह विविध कामांसाठी नागरिक अर्ज करीत आहेत. तलाठीच नसल्याने या कामांना मुहूर्तच सापडत नाही.

No comments:

Post a Comment