पोलीस ठाण्यांना कारभार्याची प्रतीक्षा: - चिंचवड वाहतूक विभागाचे निरीक्षक नेवे यांची बदली
पिंपरी : सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शांताराम तायडे यांना सहायक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाली आहे, तर गुन्हे निरीक्षक भागवत सोनवणे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून मुंबईला बदली झाली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश देवरे यांच्या जागी अद्याप कोणी पदभार स्वीकारलेला नाही. चिंचवड वाहतूक विभागाचे निरीक्षक सुभाष नेवे यांचीही बदली झाली आहे. शहरातील चार निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून, त्यांच्या जागी कोण कारभारी पदभार स्वीकारणार याची उत्सुकता पोलीस वतरुळाला लागली आहे.
No comments:
Post a Comment