Saturday, 1 June 2013

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढीचा प्रस्ताव

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढीचा प्रस्ताव: पिंपरी : महापालिका सेवेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी प्रशासनामार्फत स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या डॉक्टरांसह आयटीआयमधील निदेशकांचेही मानधन दुपटीने वाढणार आहे. तसा प्रस्ताव ४ जूनला होणार्‍या स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे.

महापालिका सेवेतील ९ तज्ज्ञ डॉक्टरांना दुप्पट मानधन मिळणार आहे. महापालिका सेवेतील जे डॉक्टर व्यवसायरोध भत्ता घेऊन खासगी प्रॅक्टिस करतात, त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असताना, तज्ज्ञ डॉक्टरांचे मानधन दुप्पट करण्याची भूमिका आयुक्त परदेशी यांनी घेतली आहे. या डॉक्टरांना ४५ ते ६0 हजारांपर्यंत मासिक मानधन मिळणार आहे. मोरवाडी व कासारवाडीतील औद्योगिक तंत्र प्रशिक्षण संस्थेतील निदेशकांचे मानधन दुपटीने वाढविण्याचाही प्रस्ताव आहे. त्यांचे मानधन ८ वरून १५ हजारांवर पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment