भोसरी गावठाण प्रभागाच्या पोटनिवडणुकीबाबत संभ्रमावस्था असली तरी श्रद्धा लांडे व सारिका कोतवाल यांनी आज उमेदवारी अर्ज नेल्याने वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे.
महापालिकेकडून उमेदवारी अर्ज विक्री व स्विकृतीसाठी 11 जूनपासून सुरुवात झाली. मात्र गेल्या चार दिवसात एकही अर्ज विक्रीला गेला नाही. मात्र आज श्रद्धा लांडे आणि सारिका कोतवाल यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने निवडणुकीला पुढील काही दिवसात निवडणुकीला रंग चढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज विक्री व स्विकृतीसाठी 18 जून पर्यंतची मुदत आहे.
त्यानंतर 19 जून रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून नामनिर्देशनपत्रांची छननी करण्यात येईल. छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. 21 जूनला दुपारी तीन वाजेपर्यंतची उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. 22 जून रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येतील. 22 जून रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी प्रसिध्द होईल, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी दिली.
No comments:
Post a Comment