व्हीनस लीजर इंडिया आणि शांती क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 16) निगडी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राधिकरणातील सावकार भवन येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यात सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत आरोग्य तपासणी करण्यात येईल.
यामध्ये अॅनिमिया, मधुमेह, रक्तदाब या आजाराची तपासणी व औषधोपचार केले जाणार आहे. नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन व्हीनस लीजर इंडियाचे संचालक संयोजक बाळासाहेब बांगर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment