Monday, 17 June 2013

अभियंत्याने रचला बनाव

अभियंत्याने रचला बनाव: पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्याच्या बेटिंगवरील सट्टेबाजीत सात लाख रुपये हरलेल्या नवनीत हरिश्‍चंद्र वर्मा (वय २५, रा. सरिता संगम हौसिंग सोसायटी, कासारवाडी; मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) या परप्रांतीय अभियंत्याने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचल्याचे आज उघडकीस आले. भोसरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

आयपीएलमधील विविध सामन्यांवर त्याने सट्टा लावून तो सात लाख रुपये हरला. १२ जूनला कामावर जातो, असे सांगून तो सकाळी साडेनऊला घराबाहेर पडला. त्याच दिवशी दुपारी साडेचारला त्याने कानपूर येथे राहणार्‍या वडिलांना व मेहुण्याला ‘आपले अपहरण झाले असून, माझ्या बँक खात्यावर तातडीने सात लाख रुपये जमा करा,’ अशा आशयाचा एसएमएस मोबाईलवरून पाठविला.

No comments:

Post a Comment