Saturday, 15 June 2013

मारहाण व तोडफोड करणार्‍या तिघांवर गुन्हा

मारहाण व तोडफोड करणार्‍या तिघांवर गुन्हा: पिंपरी : किरकोळ कारणावरून घरात घुसून महिलेला मारहाण करणार्‍या व घरातील सामानाची तोडफोड करणार्‍या तिघांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुशिला नवृत्ती शिंदे (५0, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विष्णू साठे, विकी साठे अशी आरोपींची नावे आहेत. एका आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता समजू शकलेला नाही. तुझ्या बहिणीची मुले कोठे आहेत, अशी विचारणा करीत आरोपी शिंदे यांच्या घरात घुसले. त्यांना स्टंपने मारहाण केली. टीव्हीची तोडफोड करून ११00 रुपये किमतीचा माल जबरदस्तीने चोरून नेला.

No comments:

Post a Comment