Monday, 10 June 2013

मोशीचा उपबाजार अनधिकृत?

मोशीचा उपबाजार अनधिकृत?: - खासदार गजानन बाबर यांचा आरोप
पिंपरी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोशी उपबाजाराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या हस्ते आज झाले. उपबाजाराचे बांधकाम अवैध असून उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध कामाचे उद्घाटन करून कायदे पायदळी तुडविल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी आज केला. मंत्र्यांनाच कायदेशीर व बेकायदेशीर यातला फरक कळत नसेल तर सर्वसामान्यांचे काय, असा सवालही त्यांनी केला. बाबर यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

No comments:

Post a Comment