पिंपरी : ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नेते शरद राव आणि महाराष्ट्र सरचिटणीस बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ८ ऑगस्टला पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.
१ ऑगस्टला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा चालक मालकांची भूमिका ठरवण्यासाठी शहरातील स्टँड अध्यक्ष/सचिव यांची बैठक रविवार, दि. २८ जुलैला दुपारी २ वाजता पिंपरी येथील महाराष्ट्र रिक्षा पंचायत कार्यालयात आयोजित केली आहे. या वेळी पंचायत अध्यक्ष आणि कृती समितीचे राज्य सरचिटणीस कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र रिक्षा पंचायत शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.

No comments:
Post a Comment