पिंपरी : छोट्या आकारातील भूखंडावर महापालिकेच्या बांधकाम नियमावलीनुसार बांधकाम करणे नागरिकांना अशक्य झाले आहे. छोट्या आकाराच्या भूखंडात बांधकाम कसे करता येईल, याची माहिती पुस्तिका, नमुना ले-आउटसह महापालिकेने काढूनही उपयोग झाला नाही. छोट्या भूखंडावर नागरिकांना बांधकाम करता येईल, यासाठी बांधकाम नियमावलीतील काही अटी शिथिल करण्यासंबंधी महापालिकेने शासनाकडून मार्गदर्शन मागवले असून, त्या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू आहे
No comments:
Post a Comment