पिंपरी : दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या निगडी आणि चिंचवड परिसरात गेल्या वर्षभरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, या भागातील महिलांमध्ये सोनसाखळी चोरट्यांची मोठी दहशत निर्माण झालेली आहे. पोलिसांची गस्त आणि नाकाबंदी असतानाही दोन्ही पोलीस ठाण्यांच्या सोनसाखळी चोरीचे प्रमाण अधिक आहे. चोरट्यांनी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान तब्बल ७५ घटनांमध्ये ३९ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज लांबवल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
No comments:
Post a Comment