पिंपरी : भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या ‘चाय पे चर्चा नमो के साथ’ या उपक्रमांतर्गत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्याशी देशातील चहावाल्यांशी संवाद साधला. या चर्चेचे चापेकर चौक, चिंचवड येथील सोनाली अमृततुल्यसमोर आयोजन केले होते. महाराष्ट्रातील दीडशे, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील चार चहावाल्यांशी संवाद साधणार होते. मात्र, सॅटेलाईटद्वारे अहमदाबाद येथील केंद्राशी संपर्क साधू न शकल्याने शहरातील चहावाल्यांशी संवाद होऊ शकला नाही.
No comments:
Post a Comment