शहरातील कोणत्याही भागातील व्यवसायिकांनी कचरा उघड्यावर टाकल्यास मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल असा इशारा पिपंरी -चिंचवड महापालिकेचे आरोग्य निरीक्षक दीपक कोटियाना यांनी दिला आहे.
कुदळवाडी भागात मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसायिकांची दुकाने आहेत. येथील रफिक रईस शेख या व्यवसायिकाला वेगवेगळ्या ठिकाणचा आणलेला भंगार माल निवडून उरलेले बिनकामाचा भंगार माल स्वराज रेसिडेन्शियल सोसायटी मागील मैदानात ट्रकने आणून टाकताना फ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरिक्षक विभागामार्फत पकडण्यात आले. याबरोबरच त्याच्याकडून 5 हजार रूपये दंड आकारण्यात आला.
No comments:
Post a Comment