Saturday, 8 April 2017

वाहतुकीची ‘जत्रा’च...

निगडी - येथील भक्ती-शक्ती चौक म्हणजे शहरातील सर्वांत मोठा चौक. मात्र, पथारीवाले आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे हा चौक वाहतूक कोंडीचा बनवला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाने या चौकात रोज जणू जत्राच भरते.
या चौकात रोज सायंकाळी वाहतुकीची जत्रा भरत असल्याने कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते; तसेच ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास होतो. अगदी रस्त्यात खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, विविध वस्तू विक्रेते आणि लहान मुलांच्या करमणुकीची खेळणी (मेरी गो राउंड) आणि या जत्रेत येणाऱ्यांनी रस्त्यातच पार्किंग केलेली वाहने याकडे संबंधितांचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे.

No comments:

Post a Comment