पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखली परिसरातील कचरा उचलला जात नाही, त्यामुळे रस्त्यावरच कचरा पडून आहे. परिसरातील नागरीक तक्रारी करत आहेत. नुकतेच नगरसेवक दत्ता साने यांनी कचरा फेको आंदोलन केले, तरीही अद्याप कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आल्याचे दिसते. त्यामुळे अधिकाऱ्यांनाच आता कचऱ्यात बसवणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरीक देत आहेत.
No comments:
Post a Comment