पिंपरी, (प्रतिनिधी) – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलातर्फे निगडी येथे 17 ते 23 एप्रिल या कालावधीत वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सात दिवसीय व्याख्यानमालेत मॉर्डनच्या यमुनानगर येथील शैक्षणिक संकुलात दररोज सायंकाळी सात वाजता विविध मान्यवरांची व्याख्याने होईल. पहिले पुष्प दि. 17 एप्रिल रोजी दिलीप हल्याळ आणि स्मिता ओक यांच्या “नजराणा हास्याचा’ या हास्य प्रयोगाने गुंफले जाईल. दि. 18 एप्रिल रोजी प्रकाश येदलाबादकर यांचे “समर्थ रामदास स्वामींची समाज चेतना’ तर दि. 19 एप्रिल रोजी विश्वास मेहेंदळे यांचे “मला भेटलेली माणसे’, दि. 20 एप्रिल रोजी प्रा. मिलिंद जोशी यांचे “अत्रे आणि पु.ल. विनोदाची दोन शिखरे’, दि.21 एप्रिल रोजी गणेश शिंदे यांचे “हे जीवन सुंदर आहे’, दि. 22 एप्रिल रोजी माणिक गुट्टे यांचे “जीवन विषयक दृष्टीकोन – अध्यात्मवाद व भौतिकवाद’ या विषयावर व्याख्यान होईल.
No comments:
Post a Comment