पुणे - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून ई- चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली जात असून, बुधवारपासून ही कारवाई सुरू झाली आहे. वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून नियम मोडणाऱ्या वाहनचालकाला त्याचे छायाचित्र, कोणत्या नियमाचे उल्लंघन केले आणि दंडाच्या रकमेचा संदेश मोबाईलवर पाठविण्यात येत आहे. ई- चलानद्वारे दिवसभरात सरासरी दीड हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment