– स्वच्छ शहरांच्या यादीत घसरण होवूनही डोळे उघडेना
– प्लास्टीक कचऱ्यामुळे भटक्या जनावरांच्या जिवीताशी खेळ
निशा पिसे
पिंपरी – वेळेवर न येणाऱ्या घंटागाड्या…, स्वच्छतेबाबत नागरिकांची उदासिनता…, अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असूनही त्याबाबत घेतली जाणारी बोटचेपी भूमिका आदींमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मोकळ्या भूखंडांना अक्षरशः उकीरड्याचे स्वरुप आले आहे. राजीव जाधव यांच्या कार्यकाळात त्यांनी भूखंड स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. तसेच अस्वच्छता पसरवणाऱ्या खासगी भूखंडांसाठी दंडात्मक कारवाईची तरतूद केली होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम “नव्याचे नऊ दिवस’ ठरली असून पावसाळा तोंडावर आल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

No comments:
Post a Comment