Tuesday, 27 June 2017

पिंपरी महापालिकेचे मुख्य लेखापाल कंत्राटदारांकडे मागत आहेत 3 टक्के; कंत्राटदारांची पंतप्रधान संकेतस्थळावर तक्रार!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे हे बिलांचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात 3 टक्के रक्कम मागत असल्याच्या तक्रारी ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर केल्या आहेत. या तक्रारींची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून खुलासा मागितला आहे. यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर, महापालिकेतील कोणताही अधिकरी नागरिकांकडून लाचेची मागणी करत असेल तर त्याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रारी कराव्यात, असा पवित्र आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. 

No comments:

Post a Comment