तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार बांधणी
देहूरोड - तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहूतील मुख्य मंदिराच्या पश्चिमेस इंद्रायणी नदीवरील पूल ते विठ्ठलवाडी व्हाया येलवाडी या १९ कोटी रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता असलेल्या पावणेतीन किलोमीटरच्या बाह्यवळण रस्त्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानापूर्वी रस्ता खुला करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. मार्गात ओढ्यावर सुमारे सव्वाशे मीटर लांब व १२ मीटर रुंदीच्या पुलाचाही समावेश आहे.
No comments:
Post a Comment