ई कनेक्ट ऍपची सुविधा, एका क्लिकवर मिळणार माहिती
पुणे – सध्या पीएमटी बस आहे कुठे…आपल्याजवळ कोणते बसस्टॉप आहे आणि कोणत्या बस कधी येणार….तिला किती वेळ लागणार…त्या मार्गावर अन्य कोणत्या बस आहेत ही सर्व माहिती प्रवाशांना आता एका क्लिकवर मिळणार आहे. कारण, “पीएमपीएमल’ने नव्याने विकसित केलेल्या “पीएमपी ई कनेक्ट’ या ऍपवरून प्रवाशांना ही सुविधा मिळणार असून, “पीएमपी’ आता “गुगल’वर आली आहे. या ऍपमुळे प्रवाशांना बसच्या सर्व स्टेटसची माहिती आहे त्या जागेववरून मिळणार असून, त्यांना वेळेची बचत आणि सुखाचा प्रवास करता येणार असल्याची माहिती पीएमपीएमलचे अध्यक्ष तुकारम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment