Monday, 10 July 2017

प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

नवे-जुने आमने-सामने : नवीन प्रभागांमुळे समिती स्थापनेला विलंब
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर विविध समित्या, सभागृहातील महत्त्वाची पदे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे दोघांनी निवडणुकीत केलेल्या परिश्रमाचे मूल्यमापन करून त्यांच्या समर्थकांना देण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या प्रस्थापित कार्यकर्त्यांना आता प्रभाग समितीचे सभापतीपद पदरात पाडून घेण्याची उत्सुकता लागली आहे. नव्याने होणाऱ्या “ग’ आणि “ह’ प्रभाग कार्यालये निर्माण करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे प्रभाग समित्यांच्या स्थापनेला विलंब होत आहे. परंतु, प्रभाग समिती सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू असून नवे आणि जुने नगरसेवक आमने-सामने आले आहेत.

No comments:

Post a Comment