Tuesday, 18 July 2017

आपत्ती विभाग “नॉट रिचेबल’

अग्निशमन केंद्रावर मदार : महापालिका प्रशासन सुस्त
पिंपरी – शहरात संततधार सुरू असून, गेल्या चोवीस तासात एकूण 53 मिमी पाऊस झाला आहे. तर, 1 जूनपासून आत्तापर्यंत 1 हजार 572 मिमी पाऊस झाला आहे. गुरुवारपर्यंत पावसाची अशीच परिस्थिती राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, या पावसामुळे रहिवाशांना अन्यत्र हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभाग तैनात असला. तरी, आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीच हालचाल नसल्याचे दिसून येते. नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षातून फोन उचलला जात नाही. तसेच अधिकारीही “नॉट रिचेबल’ असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

No comments:

Post a Comment