पिंपरी - राज्यातील विजेचा तुटवडा लक्षात घेता सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने सौरऊर्जेचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका भवनामध्ये सौरऊर्जेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी खर्च होणारी रक्कम आगामी पाच वर्षांत वसूल होणार आहे.

No comments:
Post a Comment