कंपन्यांनी नोंदविल्या सूचना ः पंधरा दिवसांत निविदा होणार प्रसिद्ध
पिंपरी, (प्रतिनिधी) – मोशी कचरा डेपो येथे शहरातील दैनंदिन संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रीया करून “वेस्ट टू एनर्जी’ हा अत्याधुनिक प्रकल्प राबविण्यासाठी ठेकेदार मिळत नसल्यामुळे प्रकल्प कागदावरच रखडला आहे. तब्बल दीड वर्षाचा कालावधी उलटला, तरी हा प्रकल्प राबविण्याच्या हालचाली होत नाहीत. परिणामी, प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु, हा प्रकल्प राबविण्यासाठी पर्यावरण विभागाने गती घेतली आहे. येत्या 15 दिवसांत कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.
No comments:
Post a Comment