पिंपरी : पिंपरी कॅम्पात विविध मोबाईल कंपन्या व व्यावसायिकांनी अनधिकृतपणे लावलेल्या जाहिरात फलकांवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने मंगळवारी (ता. 4) सायंकाळी धडक कारवाई केली.
शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पातील साई चौक, शगुन चौक, आर्यसमाज चौक, कराची चौक आदी भागात विविध मोबाईल व इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी महापालिकेची जाहिरात लावण्याची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात फलक व मोठमोठे होर्डिंग लावले होते. त्यात बाजारात नवीनच आलेल्या मोठ्या परदेशी मोबाईल कंपन्यांचा समावेश आहे. या मोबाईल कंपन्या संबंधित दुकानमालकाला लाखो रुपये भाडे देऊन विद्युत रोषणाईचे जाहिरात फलक लावत असत. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत होता. तर परिसरात बकालपणा वाढला होता. अशा प्रकारचे बेकायदा जाहिरात फलक बाजारपेठेत अनेक वर्षापासून लावले जात असून त्याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करत होते. मात्र अशा फलकांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या वाढल्याने प्रशासनाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात मंगळवारी अचानक ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment