Sunday, 16 July 2017

हिंजवडीत दुचाकींचा “महापूर’

हजारो दुचाकी रस्त्यावर: पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर
थेरगाव, – वाहतुकीच्या समस्या, सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवेचा अभाव, अरुंद रस्ते, रस्त्यावरील अतिक्रमणे अशा विविध कारणांमुळे हिंजवडीत हमखास वाहतूक कोंडी होते. ती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दुचाकींचा वापर करण्यास भर दिला. परिणामी, सकाळी आणि संध्याकाळीच्या हजारो दुचाकी या रस्त्यावर धावतात. मात्र, दुसरीकडे त्या दुचाकी पार्किंगचा प्रश्‍न भेडसावू लागला आहे. त्यामुळे पुन्हा ही वाहने रस्त्यावर पार्क केल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

No comments:

Post a Comment