तुम्ही वर्षभरामध्ये डॉक्टरांकडे किती वेळा जाता? प्रत्येक भेटीच्या वेळी तुम्ही किती कागदपत्रे, तपासणी किंवा चाचण्यांचे रिपोर्ट स्वतःजवळ बाळगता? या प्रश्नांचा गांभीर्याने विचार केल्यास लक्षात येईल, की आपण नकळतपणे कागदांचा ढीग गोळा करत बसलो आहे. त्याऐवजी मोबाईलवरील ॲप्लिकेशनद्वारे फक्त एका क्लिकवर जर तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरांना ही सर्व माहिती स्क्रीनवर दिसली तर? ‘जेनेक्स-ईएचआर’ या स्टार्टअप कंपनीने अशी सुविधा उपलब्ध करून दिली असून, तिचा लाभ देशभरातील अनेक डॉक्टर, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, शिक्षण संस्था घेत आहेत.
No comments:
Post a Comment