पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरविण्यासाठी महापालिकेने सुमारे ७० किलोमीटर लांबीचा जलवाहिनी प्रकल्प हाती घेतला होता. त्याला विरोध करण्यासाठी बऊर (ता. मावळ) येथे झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात तीन आंदोलक शहीद झाले. या घटनेला आज (९ ऑगस्ट) सात वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आज गहुंजे येथे झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या वेळी हा प्रकल्प रद्दच करण्याची मागणी उपस्थितांनी केली. भाजपचे सरकार असूनही त्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी दिसत आहे.
No comments:
Post a Comment