Monday, 14 August 2017

चित्तथरारक कसरतींनी प्रेक्षकांची मने जिंकली

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महानगरपालिका व बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने व हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स लिमिटेड यांच्या सहकार्याने एचए मैदान, सुरू असलेल्या "नो युवर आर्मी' अर्थात शस्त्रास्त्र प्रदर्शनात शनिवारी सायंकाळी जवानांनी सादर केलेल्या विविध प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांच्या अक्षरश: डोळ्याचे पारणे फेडले. ही प्रात्यक्षिके पाहण्यास शहरवासियांची गर्दी झाली होती. मल्लखांब आणि चित्तथरारक कसरतींना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे 65 हजार शहरवासीयांनी भेट दिली. असे प्रदर्शन शहरात प्रथमच भरविण्यात आले असल्याने शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रदर्शनाचा कालावधी आणखी एक दिवस वाढविल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment