Monday, 14 August 2017

घोरावडेश्‍वर : एक अध्यात्मिक पर्यटनस्थळ

सोमाटणे – पुण्यावरून मुंबईकडे जाताना द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग यांच्यामध्ये असणाऱ्या डोंगर रांगा आहेत. ज्या पावसाळ्यात निसर्गाची हिरवीगार शाल पांघरून पर्यटकांना आपल्या सौंदर्याची भुरळ घालतात. आणि याच डोंगरामध्ये एक कोरीव अशी पांडव कालीन लेणी आणि दगडातच कोरलेल शंकराच अगदी प्राचीन असे मंदिर आहे. ज्याच नाव घोरावडेश्‍वर. ज्याच पर्यटनाच्या व अध्यात्माच्या दृष्टीने याला फार महत्वाचे स्थान आहे. हे इतक मोहक आणि सुंदर आहे की कलेचा एक अद्भुत नमुना म्हणावा लागेल. येथून जाताना प्रत्येक पर्यटक भक्‍ताला याविषयी विचारण्याचा आणि येथे भेट देण्याचा मोह झाला नाही, तर नवलच. पांडव जेव्हा दोन वर्ष अज्ञात वासात होते तेव्हा त्यांनीच या मंदिराची उभारणी केली असल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात. आणि या मंदिराच्या पायथ्याशी वसलेलं अमरजाई देवीचे मंदिर आहे.

No comments:

Post a Comment