पुणे - ‘‘वीजमीटरचे रीडिंग घेण्याबरोबरच बिलवाटपासाठी नेमण्यात आलेल्या २९ खासगी एजन्सीज्पैकी काहींनी ग्राहकांकडून चुकीची आणि वाढीव बिले आकारल्याचे निदर्शनास येत आहे. अशा एजन्सींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. यासंबंधीच्या सूचना आणि आदेश कार्यकारी आणि अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत,’’ अशी माहिती पुणे परिमंडलचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी ‘सकाळ’ला दिली.
No comments:
Post a Comment