पिंपरी - सध्या जगात संपर्काचे प्रभावी माध्यम म्हणून दूरध्वनीला विशेष महत्त्व आहे. मात्र सरकारी यंत्रणा याबाबत उदासीन असल्याचा प्रत्यय पोलिस ठाण्यातील बंद दूरध्वनीवरून येतो. शहरातील दोन पोलिस ठाण्यांतील दूरध्वनी बंद आहेत, तर एका ठाण्याचा दूरध्वनी खराब झाला आहे. पोलिसांशी तातडीने संपर्क साधण्यासाठीचा 100 क्रमांक अनेकदा "एंगेज' असतो, तर पोलिस ठाण्यांचे संपर्क क्रमांक पोलिसांच्या संकेतस्थळावर दिलेले आहेत. याबाबतचा सावळा गोंधळ "सकाळ'ने केलेल्या पडताळणीत उघड झाला.

No comments:
Post a Comment