पिंपरी - शहरातील जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो आणि बीआरटी या विकास कामांमुळे परिसरातील हिरवाई गायब होणार आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने या रस्त्यावरील चार हजार 567 चौरस मीटरचे सुशोभीकरण आणि 367 झाडे अन्यत्र हलविण्यास मान्यता दिली आहे. याखेरीज या मार्गावरील 119 झाडांच्या फांद्या देखील तोडण्यास उद्यान विभागाने परवानगी दिलेली आहे.

No comments:
Post a Comment