Monday, 18 September 2017

सातारा महामार्ग रुंदीकरणाला “गती’

मार्च 2018 अखेर रस्त्याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा
– नितीन गडकरी यांच्या कानपिचक्‍यांनंतर आली जाग
पुणे – भूसंपादन आणि अन्य विकासकामांच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून “ब्रेक’ लागलेल्या पुणे-सातारा या महत्त्वकांक्षी महामार्गाच्या सहा पदरी रुंदीकरणातील अडथळे लवकरच दूर होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यासाठी रखडलेल्या ठिकाणी भूसंपादनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. संबधित जागा मालकांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या मार्च 2018 अखेर हा सहा पदरी महामार्ग वाहनचालकांसाठी खुला होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. परिणामी, या महामार्गावरील प्रवासाला अधिक “गति’ मिळणार आहे.

No comments:

Post a Comment