मान्यतेअभावी कारवाईची भिती : शैक्षणिक वर्ष धोक्यात
पिंपरी – शासनाची मान्यता नसलेल्या पिंपरी-चिंचवडमधील शाळा व्यवस्थापनांनी शासकीय नियमांची पुर्तता केली नसल्यामुळे दहा खासगी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या शाळांमध्ये शिकत असलेले हजारो विद्यार्थी अन्य शाळेत वर्ग करण्याची वेळ शाळा व्यवस्थापनावर आली आहे. यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या शाळेच्या मालकांचे धाबे दणाणले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शासकीय नियमांची पुर्तता करण्याच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापनाच्या हालचाली सुरू आहेत.
No comments:
Post a Comment