पिंपरी चिंचवड शहराने केंद्राला दिलेल्या स्मार्ट सिटी प्रस्तावामध्ये SWOT Analysis अंतर्गत WEAKNESS म्हणजेच शहराच्या कमजोरीमध्ये आयटी विभागाचा उद्धार केला आहे. प्रस्तावातील पान क्रमांक 12 मुद्दा क्रमांक 3 हे सांगतो कि पालिकेने मागील वर्षांमध्ये अनेक आयटी यंत्रणा कार्यान्वित केल्या पण त्या सर्व यंत्रणा स्वतंत्रपणे कार्यरत आहे त्यांचा एकमेकांशी मेळ नाही म्हणजेच या यंत्रणांमध्ये माहितीची देवाणघेवाण होत नाही तसेच जमा माहितीचे विश्लेषण करता येत नाही. परिणामतः आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. माहितीमध्ये चुका, तफावत आढळून आल्याने लोकप्रतिधींना शहराची सद्यस्थिती समजत नाही व धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी येतात. जर स्मार्ट सिटी प्रस्तावात हि अक्षम्य चूक नोंदवली जात असेल तर पालिकेच्या आयटी विभागाने गेल्या 5 वर्षात नक्की काय काम केले? आयटीचे धोरण दूरदृष्टीचा अभाव असल्याने कुचकामी ठरले आहे आणि या सर्वांचा ठपका आयटी विभागप्रमुख निळकंठ पोमण यांच्यावर का ठेवला जाऊ नये?
या निवेदनाची त्वरित दखल घेऊन आयुक्त योग्य भूमिका घेतील अशी नेटिझन्सला अपेक्षा आहे... त्याहुन महत्वाचे मुख्यमंत्र्यांना जर कळले कि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयटी प्रमुख हे स्मार्ट, अमृत सिटी, डिजिटल इंडिया मिशन या प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्यास सक्षम नाही तर ते कसे React होतील!

No comments:
Post a Comment