पिंपरी - प्रस्तावित म्हाळुंगे- माण रस्त्यातील मुळा नदीवरील पुलाचा रस्ता का वळविला..., जमिनींचा ताबा नसताना तीन कोटी खर्चून चांदे-रास्ते रस्ता कशाच्या आधारे विकसित केला..., हिंजवडी आयटी क्षेत्र उभारताना कचरा व्यवस्थापनाचा विचार का केला गेला नाही..., अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी (ता. 15) संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. असंख्य तांत्रिक अडचणींमुळे हिंजवडीतील सार्वजनिक मूलभूत सोयी-सुविधांचा विकास रखडला आहे. या अडचणी दूर करून लवकरात लवकर सोयी-सुविधा विकसित केल्या जातील, असे आश्वासनही बापट यांनी पत्रकारांना दिले.
No comments:
Post a Comment