पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील जुन्या आकृतीबंधानुसार आवश्यक मंजूर पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सुरुवातीला अत्यावश्यक आरोग्य, वैद्यकीय, अग्नीशामक यासह अन्य विभागातील वर्ग 1 ते 4 पर्यंतची सुमारे 250 पदे भरण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात वर्ग 1 व 2 मधील 37 मंजूर पदे भरण्यात येणार आहेत. त्यानंतर वर्ग 3 व 4 मधील उर्वरित 220 पदे भरली जाणार आहेत. मात्र, सर्वच विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाणवा असून, रिक्त पदामुळे अतिरिक्त कामाचा ताण येवू लागला आहे. याकरिता प्रशासन विभागाने आवश्यक पदाची भरती काढली आहे.
No comments:
Post a Comment