चौफेर न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या सुरक्षा रक्षकांचा कंत्राट कालावधी संपुष्टात आल्यानंतर नव्याने सुरक्षा रक्षक आणि वॉर्डन नेमण्यासाठी पालिकेने राबविलेल्या निविदेला “जीएसटी’चा फटका बसला आहे. “जीएसटी’चा अंतर्भाव करून सुरक्षेसाठी पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढावली आहे. तोपर्यंत जुन्याच कंत्राटदाराला चार महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment