फक्त 26 टक्के महाविद्यालयांनी लावली झाडे: तर विद्यापीठांचा अहवालच नाही
पुणे – राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेताना सरकारने पहिल्या टप्प्यांत महाविद्यालये आणि विद्यापीठांना दिलेले टार्गेटही ते पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे. सरकारने महाविद्यालये आणि विद्यापीठांना 100 आणि एक हजार झाडे लावण्याचे लक्ष्य दिले होते. आतापर्यंत जुलैमध्ये झालेल्या वृक्षलागवडीबाबत केवळ 26.35 टक्के महाविद्यालयांनी अहवाल सादर केले आहेत. त्यामुळेच झाडे लावण्यात महाविद्यालयीन विद्यार्थी मागे आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
No comments:
Post a Comment